चिनी मातीचे मावळे बाजारात दाखल

सुट्टीच्या दिवसात किल्ल्यांचे होते प्रदर्शन

| पाताळगंगा | वार्ताहर |

दिवाळीची सुट्टी पडली की शालेय विद्यार्थी किल्ले बनविण्याचा उपक्रम हाती घेतात. बाजारपेठेत विविध प्रकारचे किल्ल्यांसाठी लागणारे साहित्य दाखल झाल्यामुळे मुले हे मावळे खरेदी करण्यासाठी गदी करत आहेत.

ग्रामीण भागत लहान मुले मोठ्या हौसेने किल्ला बनवीत असतात. परंतु या किल्ल्यांसाठी आवश्यकता असते ती मावळ्यांची. म्हणूनच मावळे खरेदीसाठी शालेय विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. वीस रुपयांपासून ते पन्नास, शंभर रुपयांपर्यंत हे मातीचे मावळे विक्रीस ठेवले असल्यामुळे यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये हत्ती, घोडे, तोफ, गवळण, शेतकरी, विविध प्रकारचे पक्षी, वाघ, सिंह हे सर्व विक्रीस ठेवल्याने प्रत्येक विद्यार्थी आवर्जून खरेदी करीत असल्यामुळे याची मागणी वाढली आहे.

Exit mobile version