| पेझारी | वार्ताहर |
कुर्डूस येथील व सध्या गुजरात राज्यातील मोरबी, येथे वास्तव्यास असलेल्या चिन्मय सुचित पिंगळे याफ न्यू. एरा ग्लोबल ज्युनियर कॉलेज, राजकोट मोरबी, गुजरात या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी बोर्ड बारावीच्या परीक्षेत 95.20 %गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिन्मयने भौतिकशास्त्र विषयात100 पैकी 100 गुण तर रसायनशास्त्रात 100 पैकी 97 मिळविले आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर चिन्मयने घरीच ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला.
कुर्डूस या ग्रामीण भागातील हा मुलगा, कुर्डूस येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंदना व श्री. वसंत पोसू पिंगळे यांचा नातू आहे. चिन्मय चे वडील श्री. सुचित वसंत पिंगळे मोरबी, गुजरात येथील सिंपोलो व्ही. प्रा .लिमिटेड या कंपनीत मॅनेजर आहेत तर आई सौ. स्मितल (अनिता) त्याच्याच शाळेत प्राथमिक विभागात शिक्षिका आहे. चिन्मयने इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये दोन वेळा सुवर्णपदक पटकाविले आहे. चेस व फुटबॉल या खेळांमध्येही चिन्मयने विशेष प्रावीण्य मिळविले आहे. मोरबी, गुजरात येथील बुद्धिबळ क्रीडाविश्वात तो स्टेटलेवलचा गुणी, शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो.