चिपळूण पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांचा सत्कार

शिवसेनेतर्फे गॅस शेगडीचे वितरण
। चिपळूण । वार्ताहर ।
शिवसेनेच्या वतीने चिपळूण नगरपरिषदेच्या कर्मचारी व अधिकारी वृंदाचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत असून सुमारे 350 गॅस शेगडीच वितरण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत म्हणाले बचिपळूणच्या महापुरानंतर आपण केलेल्या उत्तम कामामुळे आपले शहर बर्‍यापैकी स्वच्छ झाले असल्याने आजपर्यंत लेप्टो वैगेरे सारख्या साथीच्या आजारांपासून आपण दूर आहोत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरस्थितीनंतर झालेले नियोजन तसेच त्यांनी उपलब्ध करून दिलेली आरोग्य व अन्य सुविधा यांच्यासोबत आपण सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने चांगले काम केले आहे, म्हणून आपले आभार मानायला आणि आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला आम्ही आलो आहे. भविष्यातही असेच काम आपल्याकडून अपेक्षित आहे, असे सांगून नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनाही चिपळूण मधील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही अधिकारी,कर्मचारी यांच्या कामांचे कौतूक केले. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष रोहन बने, बाळा कदम, ताप शिंदे, संदीप सावंत, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, राजू देवळेकर, उमेश सकपाळ, न. प. आरोग्य सभापती शशिकांत मोदी, न. प. बांधकाम सभापती मनोज शिंदे, न. प. महिला बालकल्याण सभापती सुरैय्या फकीर, सौ. सीमाताई चव्हाण, नगरसेवक मोहन मिरगल, सुनिल कुलकर्णी, नगरसेविका जयश्री चितळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रस्ताविक प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी तर सूत्रसंचालन शशिकांत मोदी यांनी केले. मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता 17 सप्टेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तसेच तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.

Exit mobile version