चिर्ले भुयारीरस्ता बनला धोकादायक

| उरण | वार्ताहर |

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील भुयारी रस्त्यावर शुक्रवारी (दि.30) रात्री मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात फोर व्हीलर गाडी व मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला आहे.

जेएनपीए बंदर प्रशासनाने एनएचफोरबीच्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पळस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे. या महामार्गावरील चिर्ले व धुतूम गाव परिसरातील नागरिकांना, प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एनएचफोरबीने चिर्ले व धुतूम गावाजवळ भुयारी रस्त्याची उभारणी केली आहे. परंतु भुयारी रस्ता हा प्रवाशी वाहतूकीसाठी असताना या रस्त्यावरून रात्री अपरात्री अवजड वाहने प्रवास करत आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे.

चिर्ले व धुतूम गाव परिसरातील नागरिकांचा, दैनंदिन नोकरदार प्रवासी नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सदर गावाजवळ भुयारी मार्ग बनविला आहे. परंतु रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरील भुयारी रस्त्यावरून रात्री अपरात्री अवजड वाहनांची रेलचेल असते. त्याचा त्रास नागरिक, लहान वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तरी नागरिकांच्या रहदारीच्या भुयारी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निळकंठ घरत यांनी केली आहे.

Exit mobile version