नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डसह मानद पदवीने चित्रा पाटील सन्मानीत होणार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डसाठी झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा आस्वाद पाटील यांची निवड झाली आहे. झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांना रोजगार मिळवून देत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. याची दखल घेत नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमीने चित्रा पाटील यांची सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेबद्दल निवड केली आहे. त्याच बरोबर त्यांना ‘सामाजिक कार्य’ या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे. हा समारंभ गुरुवार (दि.28) रोजी मुंबईतील सहारा स्टार या हॉटेलमध्ये होत आहे. नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमी ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. अमेरीकेत मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेच्या वतिने विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेचा सम्मान करण्यासाठी सो. चित्रा पाटील यांची नेल्सेन मंडेला नोबेल पीस पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याखेरीज अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिटन्स एज्युकेशनशी संलग्न असणाऱ्या सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सलन्स सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटतर्फे ‘ सामाजिक कार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी आपणास देण्यात येणार आहे. नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड अकादमीच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांमध्ये नवीन पिढीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. मंत्री आणि उद्योगपतीच्या उपस्थितीत गुरुवारी या पुरस्काराचे वितरण होणाऱ्या आहे. याबद्दल बोलताना चित्रा पाटील म्हणाल्या, सामाजिक कार्याची पुण्याई ही माझ्या सासूबाई माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्याकडून मिळाली आहे. तो सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. चित्रा पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version