। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल टाईम्स ऑफ इंडिया तर्फे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल बुधवारी (दि.4) अलिबाग येथे पुरोगामी युवक संघटनेतर्फे चित्रलेखा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, निलेश घरत, अभिजित वाळंज, अक्षय डिकले, वेदांत कंटक, विनीत झावरे, सोहम वागळे, तन्वी पाटील, देवाशिष माने, नागेश्वरी हेमाडे, अश्विनी ठोसर, मुळे ग्रामपंचायत सरपंच रोहिणी पाटील, संतोष पाटील, योगेश म्हात्रे, संकेत घरत, दिनेश पाटील, तेजस म्हात्रे, विनायक पाटील, संतोष राऊळ, रणजित राऊत आणि शेकापक्ष पुरोगामी युवक संघटनेचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.