चित्रलेखा पाटील यांनी घेतले कृष्णादेवीचे दर्शन

। चौल । प्रतिनिधी ।

चौलमळा येथील आई कृष्णादेवीच्या उत्सव सोहळ्यास शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उपस्थिती लावून कृष्णादेवीचे दर्शन घेतले. दरम्यान, गावचे प्रमुख रवींद्र घरत यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, वामन घरत, किशोर घरत, शैलेश नाईक, बाळकृष्ण पाटील, सुरेंद्र म्हात्रे, महेंद्र म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version