चित्रलेखा पाटील यांचा ‘सावित्रीची लेक’ पुरस्काराने गौरव

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख तथा सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्द्दल मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर पेझारी यांच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रात ‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’ या उपक्रमांतर्गत चित्रलेखा पाटील यांनी सुरू केलेल्या सायकल वाटपाच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. सालकल वाटपातून त्यांनी हजारो शालेय विद्यार्थिनींची कायमची थांबविली असून, शैक्षणिक वाटचाल सुखकर केली आहे. त्यांच्या या कार्याची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे.

दरम्यान, या पुरस्कार वितरण सोहळ्यास गु्रपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष अनिल पाटील, कार्याध्यक्ष मोहन मंचुके, सचिव जी.सी. पाटील. डॉ. तिवारी, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील इतर मान्यवर व मॉर्निंग वॉकचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version