चित्रलेखा पाटील यांच्यामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर

विद्यार्थिनींनी व्यक्त केली भावना
सावित्रींच्या नागाव येथे सन्मान

। अलिबाग । प्रतिनिधी ।
घरची बिकट परिस्थिती, शाळेचे अंतर दूर असल्यामुळे बसने प्रवास करणे कठीण, तर कधी बस पोहोचत नसल्यामुळे चालत होणारा प्रवास, उशीर झाला म्हणून होणारे शैक्षणिक नुकसान हे सारे प्रश्‍न आज चित्रलेखा पाटील यांनी दिलेल्या सायकलमुळे सुटले. त्यांच्या मदतीमुळे अनेक मुलींचा शिक्षणाचा मार्ग झाला. चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे सार्‍या मुली त्यांच्या ॠणी आहेत, असे मत नागाव हायस्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी जुही घरत हिने व्यक्त केले. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील नागाव येथील 130 मुलींना मोफत सायकलींचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी या चिमुकलीने तिचे मत केले.

यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, नागाव शाळेचे अध्यक्ष एम.एन. पाटील, सरपंच निखिल मयेकर, अभिनेत्री ज्योती राऊळ, उपसरपंच रसिका प्रधान, सदस्य राकेश म्हात्रे, मंजुषा राणे, हर्षदा मयेकर, श्रीकांत आठवले, राजू मयेकर, शेकापचे विभागीय पदाधिकारी सचिन राऊळ, अनिरुद्ध राणे, मुख्याध्यापक अजित पाटील, सहशिक्षिका जान्हवी बनकर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, चाक हे प्रगतीचे साधन आहे. आयुष्यात वेग देण्याचे काम चाकाचे आहे. सायकलच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंच व्हावा, यासाठी शेकाप कायम कटिबद्ध आहे. गरीब, गरजू होतकरू विद्यार्थिनींना सहज व सोप्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना त्यांना कोणत्याही अचडणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने शेकाप हा उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य हर्षदा मयेकर यांनी, तर सूत्रसंचालन जान्हवी बनकर यांनी केले.

पार्ट्यांसाठी नाही तर शिक्षणासाठी खर्च करु: चित्रलेखा पाटील
शेकापने कायम सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी कायम प्रयत्नशील असणारा शेकाप दारुच्या पार्ट्यांसाठी नाही, तर शिक्षणासाठी खर्च करेल. मतांसाठी पार्ट्यांना पैसे देणारा शेकाप नाही. शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रश्‍नांसाठी हक्काने आवाज द्या. शेकाप कायम तुमच्या पाठीशी राहील.

निरागस चेहर्‍यावर समाधानाचे हसू
गरजू विद्यार्थिनींना सायकलींची भेट देत त्यांच्या निरागस चेहर्‍यावर समाधानाचे हसू पेरण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी शेकापच्या माध्यमातून केले आहे. गरजू विद्यार्थिनींना मदतीचा हात देऊन त्यांच्या शालेय शिक्षणाची खडतर वाट सुकर करणारा हा उपक्रम राबवण्यात आला. गरजू, गरीब विद्यार्थिनींना अनेक समस्यांचा सामना करत शिक्षण घ्यावे लागते. त्यात अनेक वेळा त्यांना अडचणींअभावी सोडून शिक्षणाला मुकावे लागते. मात्र, शेकापने सायकलच्या रुपात दिलेल्या मदतीच्या हातामुळे आता विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सोयीचे होणार असल्याने विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू दिसून आले.

Exit mobile version