। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मुस्लिम बंधु व भगीनींना रमजान ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी सोगाव येथील मुस्लिम बांधवांनी चित्रलेखा पाटील यांचे स्वागत केले. तसेच, रमजान महिन्यात पूर्ण तीस दिवसांचे उपवास (रोजे) करणार्या लहानग्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी वसीम कुर, मुद्स्सर कुर, मजीद कुर, अश्रफ सोंडे, रब्बानी कुरेशी, शफी वाकनिस, साहिल शिरगावकर, साजीद शिरगावकर, माहीद कुर, असीम कुर, जमीर वाकनिस, हाफिज कैस कुर, आसिफ वाकनिस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.