। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रचार दौरा सुरु केला आहे. रविवारी कुर्डूससह पोयनाड परिसरात त्यांचा दौरा असणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारी चित्रलेखा पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी पेझारी येथे नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुर्डूसपासून पोयनाड भागात प्रचार दौरा होणार आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुर्डूस ग्रामपंचायत मतदार संघात जाऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर चिखली, कुसूंबळे, श्रीगांव, व पोयनाडमध्ये प्रचार दौरा असणार आहे.