शंभर टक्के लसीकरणासाठी चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार

लस घेणार्‍यांना दिले रक्षा किट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी संपूर्ण अलिबाग मुरुड मतदारसंघात शंभर टक्के कोरोना प्रतिबंधीत लसीकरण होण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणत लस घेणार्‍या व्यक्तीला एक महिना पुरेल एवढया अन्न धान्याचे किट देण्यास प्रारंभ केला आहे.


या उपक्रमाचा नागाव गु्रप ग्रामपंचायतीमध्ये शुभारंभ करण्यात आला. अलिबाग तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवून प्रत्येक गावात शंभर टक्के लसीकरण करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी सुरु केले आहेत. या माध्यमातून अलिबाग तसेच मुरुड तालुक्यातील खेडोपाड्यात अभिनव उपक्रम सुरु केला आहे. कोरोना काळात रोजगार कमी झाल्याने कोणीही न खाता झोपू नये यासाठी सुरवातीपासून आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रलेखा पाटील कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी लाखो लोकांना अन्नधान्याचे वाटप केले आहेत. कोरोनाबरोबरच निसर्ग आणि त्यौक्ती चक्रीवादळ त्यानंतरचे अतिवृष्टी या संकटात देखील जनतेच्या सोबत ठाम उभे राहत त्यांनी मोठया प्रमाणावर मदत उपलब्ध करुन दिली. एवढयावरच न थांबता त्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन बेड विविध यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिलीच त्याचबरोबर कोव्हिड सेंटर सुरु करुन कोरोना मुक्तीसाठी लढा उभा केला. त्यानंतर कोरोनाच्या नायनाटासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच लसीकरण मोहिम सुरु केली. त्या माध्यमातून अलिबाग आणि मुरुड तालुक्यात लसीकरण मोहिम राबविली. लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये तसेच त्यातील गैरसमज दुर करुन शंभर टक्के लसीकरण व्हावे या हेतूने त्यांनी लस घेणार्‍या ग्रामस्थांना एक महिना पुरेल इतके अन्न धान्याचे किट उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला अलिबाग शहर, बेलकडे, ताडवागळे, नागाव, धोकवडे या गावात हा उपक्रम राबविला जात आहे. लवकरच इतर जिल्ह्यात देखील नियोजन करुन सदर उपक्रम राबविणार असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version