। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई याचां विजय निश्चत आहे, असा विश्वास तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी प्रचार दौर्यादरम्यान व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, चित्रलेखा पाटील या विधानसभेत जाणे गरजेचे असून त्यांना मत म्हणजेच महाविकास आघाडीला मत आणि म्हणूनच अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कायकर्ते व महिलावर्ग यांचा झंझावात प्रचार दौरा सुरू होता. प्रत्येक जण मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत महाविकास आघाडीच्या विचारधारा आणि आम्ही जनतेसाठी विकासात्मक धोरण राबवून जनतेचे विविध प्रश्न निश्चितपणे सोडवणार. तसेच, चित्रलेखा पाटीला उर्फ चिऊताई या सुशिक्षित असून त्यांनी अलिबाग-मुरूड-रोहा मतदार संघात कला, शैक्षणिक व सामाजिक अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल मतदार घेतील आणि भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास भास्कर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.