चिऊताई, विजयी भवः! चित्रलेखा पाटील यांचा चौलमध्ये झंझावात

गावभेटीदरम्यान घेतले ग्रामदेवतांसह ज्येष्ठांचे आशीर्वाद

| चौल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, बुधवारी (दि. 30) चौल विभागातील अनेक गावांना भेटी दिल्या. दरम्यान, त्यांनी अनेक निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ज्येष्ठांनी स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील यांच्यासोबत केलेल्या कामांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी चिऊताईंना आपणच विजयी होणार याची खात्री देत आशीर्वाद दिले. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांचे अनेक ठिकाणी औक्षण करीत उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

1 / 7

चौल विभागातील ग्रामदेवतांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीवार्द घेण्यासाठी शेतकरी कामागर पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी बुधवारी चौल विभागातील चौलमळा, सागमळा, एस. नाईक आळी, तुलाडदेवी, चौल बेलाई, चौल भोवाळे तसेच चौल पंचक्रोशितील अनेक गावांना भेटी देत तेथील ग्रामदेवतांसह पक्षाच्या निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी “तुम्ही निश्‍चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपला विजय विक्रमी मताधिक्यानेच होणार, असा शब्द यावेळी चौल विभागातील ग्रामस्थांनी चित्रलेखा पाटील यांना दिला.

दरम्यान, या गावभेटीदरम्यान चित्रलेखा पाटील यांनी चौलमळा येथील जयंत नाईक, किशोर घरत, जीवन लोहार, बाळाराम नाईक, ग्रा.पं.चे माजी सदस्य शशिकांत म्हात्रे यांच्या दुकानात, सागमळा येथील विलास नाईक, तुलाडदेवी आदेश काशिनाथ नाईक, नितीन पराड, श्री. ठाकूर, टेकाळकर आळीत सुजय टेकाळकर, भाटगल्लीत रमेश म्हात्रे गुरजी, आर. के. मेमन, सरराईमध्ये अनिल तुरे, चौल भगवती येथे प्रशांत वर्तक, आशिष पाटील, चौलनाका येथे पोवळे सर, प्रशांत जाधव, रोहिदास म्हात्रे, चुने कोळीवाडा, काटकर आळी, शितळादेवी मंदिर, आग्राव कोळीवाडा, जानवीचे तळे आदी ठिकाणच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी फटाके फोडून आणि औक्षण करुन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच चौल विभागातील गावांना भेटी दिल्या. ज्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास इथपर्यंत आला आहे, त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. ज्यापद्धतीने आपण याअगोदर मला आपले मानत आपले आशीर्वाद दिलेत, तसेच आताही माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

या गावभेटी दौर्‍याप्रसंगी चौल विभागप्रमुख अरविंद शिवलकर, जयंत नाईक, आर.डी. नाईक, किशोर घरत, विजय ठाकूर, एस.पी. ठाकूर, राजेंद्र ठाकूर, रमेश म्हात्रे, काशिनाथ घरत, विनोद ठाकूर, शैलेश नाईक, महेंद्र नाईक, महेश पाटील, हेमंत (पप्पू) पाटील, अमित फुंडे, राहुल नाईक, उदय नाईक, अनिल तुरे, प्रशांत जाधव, वंदेश तेलंगे, गोरख डोयले, कुंदन भगत, रजनी अधिकारी, रोशन ठाकूर आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठांनी जागवल्या आठवणी
चित्रलेखा पाटील यांच्या गावभेटीदरम्यान चौलमळा येथील 91 वर्षीय बाळाराम बाळकृष्ण नाईक (अण्णा) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही त्या काळात खटारा घेऊन गावागावात प्रचार करायचो. मी स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील यांच्यासोबत काम केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चिऊताई, तुम्ही निश्‍चिंत राहा, विजय तुमचाच आहे, असा आशीर्वादही त्यांनी यावेळी चित्रलेखा पाटील यांना दिला. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी अण्णांचे चरणस्पर्श करीत पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या.
Exit mobile version