। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
जय हनुमान सामाजिक सेवाभावी संस्था भेरव यांच्यावतीने सुधागड तालुका स्पोर्ट्स असो.च्या मान्यतेने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.22) भेरव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 16 आमंत्रित संघांना संधी मंडळानी दिली होती. या स्पर्धेनिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत श्री स्वयंभू हनुमान चीवे विरुद्ध भैरीनाथ क्रिडा मंडल वावे या संघात रोमहर्षक लढत झाली. या स्पर्धेचे चिवे संघांनी विजेतेपदाला गवसणी घातली. तर, उपविजेता वावे हा संघ ठरला. तसेच, ओम कालभैरव क्रीडा मंडळ आपटवणे हा तृतीय क्रमांक आणि जय हनुमान क्रीडा मंडळ आसरे नवघर हा नवखा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. या विजयी संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.







