। पेझारी । वार्ताहर ।
आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईचे पनवेल येथे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तेथे लागणारे मनुष्यबळ, उपलब्ध नोकरीच्या संधी, उपलब्ध होणारे व्यवसाय, उद्योग यांचा अभ्यास करून दहावी बारावीनंतर उच्च शिक्षण घेताना योग्य त्या शाखांची निवड करा, असे मोलाचे मार्गदर्शन माजी आमदार पंडित पाटील यांनी नुकत्याच मार्च 2024 मधील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात केले.
यामध्ये बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून गेना धनराज लक्ष्मण 92.33 टक्के गुण मिळवून शाखेत व कनिष्ठ महाविद्यालयात सर्वप्रथम, मोहंमद वसिफ सखरेआलम 89.83 टक्के गुण मिळवून द्वितीय तर टेमकर पूर्वा अनुरुद्र 82.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल ही 100 टक्के लागून जोशी सानिका मनोविजय 72.83 टक्के प्रथम, पाटील सानिका प्रवीण 68.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर देवासी अंजू उकाराम 66.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. कला शाखेचा निकाल 92.68 टक्के लागला असून जुईकर ओम दीपक 66.33 टक्के गुण मिळवून प्रथम, चवरकर स्नेहा महेश 65.83 टक्के गुण मिळवून द्वितीय तर पाटील यज्ञेश अनिल 60.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. किमान कौशल्य विभागाचा निकाल 83 टक्के लागला असून पाटील नितेश विजय 61.83 टक्के गुण मिळवून प्रथम, पाटील श्रेयश रमेश 56.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर पाटील ओंकार नंदकुमार 55 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. इयत्ता दहावीचा निकाल 98.67 टक्के लागला. असून, म्हात्रे जिया प्रीतम व पाटील सावरी महेश या दोन विद्यार्थिनी 93.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. द्वितीय क्रमांक पाटील सृष्टी सागर 92.20 टक्के तर गोंधळी सई जगदीश 90.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सुशीला सदन येथे माजी आमदार पंडित पाटील, माजी रा. जि. प. सदस्या भावना पाटील, अलिबाग पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.