कोर्लईत नाताळ सण साजरा

| कोर्लई | प्रतिनिधी |

ऐतिहासिक व तीनशे वर्षांहून अधिक पारंपारिक वारसा लाभलेल्या मुरुड तालुक्यातील कोर्लईच्या माऊंट कार्मेल चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्म दिवस नाताळ सण हर्षो उल्हासात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठ दिवस मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोर्लईतील माऊंट कार्मेल चर्चला तब्बल तीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास व वारसा लाभलेला आहे. या चर्चची स्थापना सन. 1713 मध्ये झाली, आजही त्याच जोमाने, उत्साहाने येथील ख्रिस्ती बांधव नाताळ सण साजरा करतात. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मुंबई, पुणे, वसई अन्य ठिकाणी कामानिमित्त बाहेर असलेले बांधव एकत्रितपणे येतात. त्यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण असते. (दि.23) डिसेंबर रोजी चर्च लगत असलेल्या माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभू येशूचा जन्माचे एका छोट्या नाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर सांताक्लाजने मनोरंजन नृत्य सादर करून, मुलांना चॉकलेट दिले. दि.24 डिसेंबरच्या रात्री प्रभू येशूचा जन्म सोहळा चर्चमध्ये मिस्सा बलिदान अर्पण करून आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी माऊंट कार्मेल चर्चचे फादर बोनाव्हेंचर नुनीस यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version