अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागातर्फे विविध ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर सध्या कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नुकतेच सिडकोच्या अनधिकृत बांधकाम (न.मुं) विभागामार्फत पुष्पकनगर नोड येथे निष्कासन मोहीम राबवून सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील से-1 ते 5 येथील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली.

पुष्पकनगर नोड येथे सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील से-1 ते 5 येथील अंदाजे क्षेत्रफळ 6000 चौ.मी. क्षेत्रफळामधील जागेवर सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता ढाबे, भाजी मार्केट, भंगार दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे कारवाईची मोहीम राबवून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित केली आहेत. कारवाईची ही मोहीम सिडको पुष्पकनगर अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी 10 लेबर, 1 जेसीबी, 2 जीप, 1 टेम्पो ट्रॅव्हलर असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.

Exit mobile version