सिडकोचा वडघर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष विचारणार जाब

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील वडघर येथील नामदेव वाडी येथील घरे सिडकोने निष्कासित केली. त्यामध्ये महेश लक्ष्मण साळुंखे, बळीराम थप गदिर, कुरमन बारक्या वाडू व इतर जयश्री विजय पाटोळे, लक्ष्मीबाई लाडकं म्हसे यांची राहती घरे सिडकोने निष्कासित केली. त्यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुमचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला भूखंड वितरीत केले जातील. परंतु त्यांना सद्यःस्थितीत वेगळ्याच ठिकाणी भूखंड वितरीत केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी, याबाबत सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सिडको मुख्य भूमी व भूमापन अधिकारी यांना निवेदन दिले आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासी, मागासवर्गीय गोरगरीब जनतेची संगनमताने फसवणूक केलेली आहे. त्या विरोधात लवकरच महेश साळुंखे यांनी जनआंदोलन उभे करण्याचे ठरविले आहे.

Exit mobile version