छत्र्या, प्लास्टिक पत्रे खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो सुरु होण्याआधी रेनकोट, रंगबेरंगी छत्र्या, प्लास्टिक पत्रे, बॅग कव्हर, ताडपत्री खरेदी करण्यासाठी शहरामध्ये नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान यंदाच्यावर्षी छत्री व रेनकोटचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. येत्या 15 जून पासून राज्यातील सर्व शाळा सुरु होणार आहेत. तसेच हवामान बदल झाल्याने राज्यात मॉन्सून कधीही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोसळणार्‍या पावसांच्या सरींपासून स्वतःचे तसेच घराचे रक्षण करण्यासाठी उपयोगी असलेली प्लास्टीकची ताडपत्री, रेनकोट, छत्री यांची खरेदी करण्यासाठी नागरीकांनी बाजारपेठेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच इंधनाचे दर वाहतुकीचाही गगनाला भिडल्याने खर्च वाढला आहे. याशिवाय मेटल, पॅकिंग पेपर महागल्याने यंदा पावसाळी खरेदीत नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहे.

Exit mobile version