विजेच्या लपंडावाने नागरिकांचा संताप

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
खांदेश्‍वर वसाहतीमधील सेक्टर 6 परिसरातील वीजग्राहक रविवारी मध्यरात्रीपासून वीजेविना आहेत. दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत वीजग्राहकांना वीज नेमकी कधी येणार याची माहिती मिळाली नसल्याची तक्रार वीजग्राहक करत होते. रविवारी रात्री दोन वाजल्यापासून सेक्टर 6 व परिसरात अनेकांची वीज गायब झाली.

वीजवाहिनी तुटल्याने हा विजखोळंबा झाल्याची माहिती वीज महावितरणच्या कर्मचार्‍यांनी दिली. सकाळी वीज येईल अशी अपेक्षा होती. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत 12 तास उलटले तरीही वसाहतीमधील अनेक भागात वीज परतली नसल्याने वीजग्राहक संतापले होते. वीज महावितरण कंपनीचे अभियंता माने यांनी वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सूरु असून लवकरच वीज परत येईल, अशी माहिती दिली.

Exit mobile version