एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड शहरातील बाजारपेठेत बॅक ऑफ इंडियाचे एटीएम असुन त्या एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांनी नाराजी दर्शवली आहे. लोकांना छोट्या मोठ्या कारणांसाठी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी रोज पैसे लागतात. तसेच, व्यापार्‍यांना व्यापारासाठी पैशाची कमतरता भासत असते. शहरात बॅक ऑफ इंडिया व भारतीय स्टेट बँकचे दोन राष्ट्रीयकृत एटीएम आहेत. परंतु, बॅक ऑफ इंडिया एटीएममध्ये नो कॅश तर स्टेट बँकेत नो नेटवर्कचे बोर्ड असल्याकारणाने ही दोन्ही एटीएम सध्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. तर, दुसरीकडे खासगी बँकांच्या एटीएममधुन काही प्रमाणावर रक्कम ग्राहकांना मिळत आहे. पण राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममधुन रक्कम का मिळत नाही, असा सवाल सर्व सामान्यांकडून होत आहे. गेले चार दिवस हेच चित्र असून ग्राहकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version