नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

मुरूडमधील नागरिक नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर हीट अनुभवत आहेत. येथील तापमान रात्रीच्या सुमारास 26 अंशावर तर दुपारी 32 अंशावर जात असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. हिवाळी महिन्यात हीटचा जहर धक्कादायक आहे, अशी चर्चा मुरूड परिसरात होत आहे. यंदा भरपूर पाऊस पडला आहे. मुरूड तालुक्यात 3 हजार मिमीच्यावर पाऊस झाला आहे. यामुळे बोचरी थंडी पडणार हे निश्‍चित आहे. मात्र, हिवाळा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात थंडी पडलेली नाही. या उलट मुरूड, श्रीवर्धन, अलिबागसारख्या समुद्रकिनारी भागातदेखील सकाळच्या तापमानात वाढ होत असल्याने स्थानिक आणि पर्यटकांना गरमीचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version