। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण नाका हा अंत्यत महत्वाचा नाका मानला जातो. अष्टविनायकापैकी पाली येथील बल्लााळेश्वर गणपती मंदिर तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरुड- जंजिरा व श्रीवर्धनकडे देखिल जाण्यासाठी वाकण नाक्यावरुनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत वाकण नाक्यावरती वाहनांची वाट बघणार्या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून वाकण नाक्यावरती वाहनांची वाट बघत उभे राहणार्या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे तसेच वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. महामार्गाच्या कामासाठी संपूर्ण झाडे तोडण्यात आल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत भंयकर अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये वाहनांची वाट बघत राहणार्या अनेक प्रवाशांमध्ये चक्कर येऊन पडण्याची संख्या देखिल वाढलेली आहे. त्यामुळे वाकण नाक्यावरती प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत.