गॅस सिलेंडरच्या त्रासातून नागरिकांची सुटका

। माथेरान । वार्ताहर ।
इंदिरा गांधी नगरातील नागरिकांना नेहमीच गॅस सिलेंडरसाठी दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत होते. याकामी गॅस ग्राहकांना विश्‍वासात घेऊन त्यांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सुतार यांनी गॅस डिलर यांच्याशी संपर्क साधून वेळेत गॅस सिलेंडर मिळावेत आणि सर्व नागरिकांना सोयीस्कर पडतील जेणेकरून वाहतुकीचा खर्च सुद्धा कमी होईल या संदर्भात चर्चा केल्यानंतर आता गॅस सिलेंडर इंदिरा गांधी नगरातील प्रवेशद्वार येथे उतरवल्या जात आहेत.

चंद्रकांत सुतार यांनी सर्व ग्राहकांचे सिलेंडरसाठी लागणारे आणि वाहतुकीचे पैसे घेऊन घरपोच सेवा दि.25 मे पासून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा वेळ वाया जात नाही.सर्वांना घरपोच सेवा उपलब्ध झाल्याने सर्वानी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी चंद्रकांत सुतार यांना महेंद्र जाबरे यांनी मोलाची साथ दिली आहे. गॅस टाकी सेवा घरपोच देण्याचे नियोजन योग्यरित्या केल्याने गॅस टाकीसाठी होणारा त्रास कमी झाला आहे. घरपोच गॅस टाकी आणून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सुतार यांचे
इंदिरा गांधी नगरचे रहिवासी रमाकांत तोरणे, रितू, पुष्पा कदम, सुरेश शिंदे,स्वप्नील गोसावी यांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version