। म्हसळा । वार्ताहर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशभरातील केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हसळा येथे लोकप्रतिनिधी आणि नागरीकांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पाहिला.
या कार्यक्रमात पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती मधुकर गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, सहाय्यक गटविकास अधिकारी नाखले, गटशिक्षणाधिकारी मंगेश साळी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सुनील गायकवाड, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कळबास्कर, कृषीविस्तार अधिकारी बाक्कर रेणुका पाटील, पालवे आदि मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या संवादात म्हसळ्याचे नागरीक सहभागी
