। पनवेल । वार्ताहर ।
नविन पनवेल येथील शिवसेना जिल्हाप्रमुख जनता दरबारात महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांनी वाचला पाढा वाचला असता अनेक समस्यांचे तात्काळ जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी निराकरण केले. यावेळी सामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच सोसायटींच्या समस्या जाणून घेण्याकरिता व त्यावर योग्य ते निराकरण करण्यासाठी शिरीष घरत यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते त्यावेळी येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न, वीज , रस्ते , गटारे , साठणार कचरा , अस्वचता आदी संदर्भातील तक्रारी येथे मांडल्या या जनता दरबारामध्ये योगेश तांडेल नविन पनवेल यतिन देशमुख, अपूर्वा प्रभू, सी. पी. प्रजापती, किरण तावदरे व सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांनी वाचला पाढा
