| कोर्लई | प्रतिनिधी |
जनगणना 2027 च्या अनुषंगाने मुरुड शहर, तालुक्यात पहिल्या टप्प्यात घराची यादी आणि गृहनिर्माण गणना करीता नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देणार असून, घरांच्या भेटी दरम्यान आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य जनगणना संचालनालयाचे संयुक्त सचिव आणि मुख्य प्रधान जनगणना अधिकारी यांचे कडील पत्रान्वये जनगणना-2027 चा कार्यक्रम आखून दिलेला आहे. पहिल्या टप्यातील कामकाज म्हणजेच स्वतःची गणना ही 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये तसेच घर यादी व घरगणना दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत नियोजीत आहे. मुरूड शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. जनगणना 2027 च्या अनुषंगाने पहिल्या टप्यात घराची यादी आणि गृहनिर्माण गणना करीता नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना घरांच्या भेटी दरम्यान माहिती उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले आहे.
जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे: आदेश डफळ
