| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा शहर आणि तालुक्यांत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली आहे. मे 2023 ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत कुत्रा दंशाचे 140 रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र 10, खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र 12 आंबेत प्राथमिकआरोग्य केंद्र 4, जिल्हा परिषद दवाखाना पाभरे तीन आशा 169 जणाना भटके कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे म्हसळा शहर आणि तालुक्यांत भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनली आहे.