। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ शहरातील शिंपी आळी वार्डमधील शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यावतीने प्रचार दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड बाजारपेठेतील व्यावसायिकांसह महिलांच्या विविध समस्या स्नेहल जगताप याच सोडवू शकतात, असा विश्वास येथील नागरिकांमध्ये असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी कौशिक पोरे, पराग टमके, प्रदीप मुळे, सुहास तलाठी, दीपक पोटे, साहिल हेलेकर, राजा मुळे, रितेश वनारसे, केदार रवळेकर, प्रथम टमके, यश हेलेकर, साहिल शेठ, श्रेयश शेठ, दीपक शेठ, दीपक पोटे, श्रीकांत पोटे, अजिता मुळे, रुचिता मुळे, स्वाती वनारसे, माधुरी वनारसे, वैशाली वनारसे, मधुमती रवळेकर, आरती हेलेकर, स्नेहा हेलकर, अक्षया हेलेकर, रेवा मुळे, संचिता मुळे, ऐश्वर्य शेठ, शीतल शेठ, आहुजा सलागरे, मनाली पोरे आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.