वाढत्या इंधन चोरीमुळे नागरिक हैराण

चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

| उरण । वार्ताहर ।
डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्याने डिझेल व पेट्रोलची उरणमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी सुरु झाली आहे. गव्हाण फाटा हद्दीपासून ते जेएनपीटी परिसरात डिझेल, पेट्रोल चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहेत.उरण तालुक्यात दिघोडे, जाभूळपाडा, चिर्ले,धूतूम, द्रोणागिरी नोड आदी परिसरात व आजूबाजूच्या गावाजवळ चो-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.21 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी तसेच 7 मार्च रोजी छक 348 या राष्ट्रीय महामार्गावर टाटा नेक्सॉन (ग्रीन कलर ), होन्डा डब्लू आर व्ही (रेड कलर ), हुंदाई एकसेंट (व्हाईट कलर) चे नंबरप्लेट नसलेले या फोर व्हीलर वाहना द्वारे डिझेल व पेट्रोलची चोरी करण्यात आली आहे.तर अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या मोठ्या आईलच्या गाड्यातून पेट्रोल,डिझेलच्या गाड्यातून पाईप लाईन द्वारे मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलची चोरी सुरु आहे.

असे प्रकार उरण मध्ये सर्रासपणे सुरु आहेत. महाराष्ट्र ढाबा, विरग्रो यार्ड,आर आर लॉजिस्टिक, वैश्‍वी सी. एफ एस, एल.पी.यार्ड,पंजाब कंपनी, एच.पी.पेट्रोल पंपाच्या रोडवर फेब्रुवारी 2023 व मार्च महिन्यातही नंबर प्लेट नसलेल्या वाहनातून डिझेल पेट्रोलची चोरी झालेली आहे.एका दिवसाला लाखो रुपये हे चोर कमवत आहेत. त्यामुळे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिकारी असलेले नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी आता जनतेतून केली जाऊ लागली आहे

Exit mobile version