। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस प्रतीक जुईकर यांचा नागरी सत्कार 27 नोव्हेंबर रोजी नेरळ येथे होणार्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी बनलेले कर्जत शहरात वास्तव्यास असलेले प्रतीक जुईकर यांचा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्यावतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरचे जिल्ह्यातील पहिले भारतीय प्रशासन सेवेतील पहिले अधिकारी बनलेले प्रतीक जुईकर आहेत. 27 नोव्हेंबर रोजी नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात देशाचे पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास मयूर शेळके यांचा सन्मान देखील याच कार्यक्रमात होणार आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, केशव मुने, शिवराम बदे यांच्यासह कार्यकारिणीने दिली आहे.