| नेरळ | प्रतिनिधी |
कशेळे गावासारख्या गावात कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची असताना कशेळे गावातील विलास मते यांनी कठोर परिश्रम घेऊन पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत भरारी घेतली आहे. त्यांच्या या उत्तुंग भरारीबद्दल कशेळे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक विलास मते यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षक या पदापर्यंत घेतलेली भरारी स्पर्धा परीक्षा देणार्या मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलीस खात्यातील इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहचणारा कर्जत तालुक्यातील पहिलाच अधिकारी असल्याने त्यांचा सत्कार कशेळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कशेळे गावातील जेष्ठ नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.