सिव्हीलचा अतिदक्षता विभागच व्हेंटीलेटरवर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग दुरूस्तीच्या नावाखाली गेले दोन-तीन महिने बंद आहे. त्यामुळे तात्पुरता अतिदक्षता विभाग हे त्याच इमारतीच्या दुसर्या माळ्यावर असलेल्या महिला वार्डात स्थलांतरीत केला आहे. या महिला वार्डात एका बाजुला सिरीअस पेशन्टला व्हेंटीलेटरच्या बेड लावून पेशंटवर उपचार करतात तर दुसर्‍या बाजुला महिला रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था केली आहे. या दुसर्‍या बाजुला फक्त 12 बेडच्या जागेत चक्क 19 बेड बसविलेत त्यामुळे तेथे रूग्ण व त्यांचे काळजी घेणारे नातेवाईक यासाठी हे एकदम दाटीवाटीत राहव लागत आहे. आयसीयु पेशंटची नाजूक अवस्था असते.

रूग्णावर उपचार चालू असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणे अपेक्षित नसते. मात्र सध्या तसा प्रकार होताना दिसत नाही. दोन्ही प्रकारच्या पेशंटना हकनाक त्रास सहन करावा लागतोय. आयसीयु विभागातील दुरूस्तीचे काम कित्येक दिवसापासून बंदच आहे. ज्यामुळे सर्व रूग्णांची ससे होलपट चालू आहे.या बाबतीच्या तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत. लवकरात लवकर काम पुर्ण करून आयसीयु पेशंट आणि महिला वार्डातील रूग्ण यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version