| रसायनी | वार्ताहर |
रसायनी वावेघर बाजारात एकमेकांना धक्का लागल्याच्या रागातून हाणामारी झाल्याने रसायनी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वावेघर येथील शारदा पवार यांचा दीर गोविंद चव्हाण यांचा सुमित पवार यांस रस्त्यावरुन चालताना धक्का लागला या कारणावरुन ताराचंद चव्हाण, गोविंद चव्हाण, सासरे सीताराम चव्हाण असे त्यांच्या कुटुंबासोबत घरी असताना वावेघर येथील राहणारे आरोपी मोतीराम पवार, राहुल पवार, अजय राठोड, अनिल पवार, ममता पवार, सोनाबाई राठोड, गोविंद राठोड सर्व राहणार वावेघर यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय शारदा पवार यांच्या राहत्या घरात प्रवेश करुन त्यांना व त्यांचे पती, दीर, सासरे यांना शिवीगाळी, दमदाटी करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के.पी. पवार अधिक तपास करीत आहेत.