स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग

स्वच्छता प्रीमियर लीग बक्षीस वितरण कार्यक्रम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषद, इकोसत्व इन्व्हरमेंटल सोल्युशन प्रा.लि., द इन्क्युबेशन नेटवर्क, सेकंड म्युस आणि व्हिडीके यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येत असून, या अंतर्गत शून्य कचरा मोहीम, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कामे तसेच माझी वसुंधरा अंतर्गत येणारी कामे यशस्वीरित्या पार पाडली जात आहे. यामध्ये प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर सर्व सफाई कर्मचारी अतिशय उत्कृष्टपणे आपले काम पार पाडत आहे. कर्मचार्‍यांना दैनंदिन कामकाजात प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल उंचवावे या अनुषंगाने स्वच्छता प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ऑनलाइन ऐप द्वारे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर भेट देऊन घंटागाडी/झडाई कर्मचारी यांचे संकलन, वर्गीकरण, पीपीई वापर, सेटअप, झडाई, नागरिकांचा फीडबॅक, शहरातील होम कंपोस्टींग करणारे नागरिक यांची पाहणी याद्वारे मूल्यांकन करून विजेते निवड करण्यात आले नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नगर विकास अभीयंता महेश डफळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला व विजेते सफाई कर्मचारी यांना मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यामध्ये सर्वप्रथम कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत समारंभ इकोसत्व प्रतीनिधी मल्हारी यांनी केले. इकोसत्व सह-समन्वयक अम़ोल दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन बक्षिसे वितरण तसेच सफाई कर्मचारी करीत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले व कामामधील आवश्यक बदलबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमामध्ये इकोसत्व प्रतिनिधी मल्हारी पंडीत स्वच्छतेपर आधारित गीत सादर केले. यादरम्यान मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सफाई कर्मचारी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले व असेच शहर शून्य कचरा अभियान राबविणे करिता कामे करीत राहावी तसेच इकोसत्व टीमचे कचरा वर्गीकरण प्रबोधन, मोनिटरिंग, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा, ओडिएएफ अंतर्गत केलेली कामे, नागरिक सहभाग, जनजागृतीपर घेतलेले इव्हेंट्स व सहकार्यबाबत विशेष कौतुक केले. कार्यक्रमामध्ये घंटागाडीवरील कर्मचारी तसेच झडाई महिला, अलिबाग बीचवरील महिला कर्मचारी यांचे पहिले तीन क्रमांक काढण्यात आले.

घंटागाडीवरील बक्षिसे
प्रथम क्रमांक – घंटागाडी क्र एमएच 06 बीडब्लु 2630 वरील चालक-संतोष जाधव
कर्मचारी – संजय चनाल.
द्वितीय क्रमांक – घंटागाडी क्र एमएच 06 बीजी 4494
चालक – प्रसाद जाधव
कर्मचारी – सुधिर पाटिल
तृतीय क्रमांक – घंटागाडी क्र एमएच 06 बीजी 4493
चालक – निलेश गायकवाड
कर्मचारी – तेजस पत्रे
झडाई महिला बक्षीस

प्रथम क्रमांक – दिपाली सोनावने, पुजा जाधव
द्वितीय क्रमांक – ताराबाई गायकवाड, ममता पाटिल
तृतीय क्रमांक – मानीबाई पवार, सवीना पवार

Exit mobile version