अलिबाग-मांडवा रस्त्याच्या साईडपट्टीची सफाई करा

। सारळ । वार्ताहर ।
अलिबाग-मांडवा रस्ता सध्या सुस्थितीत असला तरी, पावसाळ्यात या रस्त्यालगत अनेक ठिकाणी साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या गवताने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे साईडपट्टीचे अस्तित्व संपल्यात जमा झाले. अशा साईडपट्टीमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाढणार्‍या वाहतुकीस त्याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती अपघाताला पूरक असल्याचे मत गावकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत लक्ष देऊन साईडपट्टी साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

विशेषतः बाहेरून आलेल्या वाहनासाठी वेगमर्यादा पाळण्याच्या सूचना मांडावा येथे साईनबोर्डद्वारे अधोरेखित होणे गरजेचे होते. इतर दिवशी मर्यादित फेर्‍यात चालणारी रो रो सेवा शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी अधिक फेरी मारत असल्याने जास्तीत जास्त पर्यटक याचा लाभ घेताना दिसतात. पण, कोव्हिड अजून पूर्णपणे संपलेला नसताना ही गर्दी योग्य आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.

Exit mobile version