हनुमान मंदिरात साफसफाई

| माणगाव | प्रतिनिधी |

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव येथील महाआराध्य प्रतिष्ठान फाउंडेशनतर्फे जुने माणगाव येथील हनुमान मंदिर व परिसरात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियान कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसाद धारिया, संचालिका अंकिता धारिया, सदस्य विक्रांत गांधी, काजल गांधी, योगिता शेठ, विपुल मेथा, चेतन मेथा, प्रवीण बागवे, सुमित पारखे, रोहित, दिनेश शहा, सचिन देसाई, दिनेश शेठ, आराध्य धारिया, परी गांधी, धनुष मेथा आदी उपस्थित होते. यावेळी आराध्य प्रतिष्ठानच्या या सर्व सदस्यांनी मंदिर व मंदिर परिसराची चांगल्याप्रकारे स्वच्छता केली. यावेळी उपस्थित जुने माणगाव येथील ग्रामस्थांनी महाआराध्य प्रतिष्ठान फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद धारिया व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करीत आभार मानले.

Exit mobile version