प्रितम म्हात्रेंनी मानले स्वयंसेवी संस्थांचेे आभार
। पनवेल । वार्ताहर ।
खारघर हिरानंदानी चौक येथे खारघर मधील काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रविवारी (दि.6) स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुट्टीचा दिवस असून सुद्धा नागरिकांची उपस्थिती श्रमदानासाठी लक्षणीय होती. पालिका प्रशासनावर स्वच्छतेच्या बाबतीत अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, इश फाउंडेशन, झिरो फाउंडेशन, युवा फाउंडेशन, सुमन साळी महिला व बाल विकास संस्था, अक्षरवेल ज्योती फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ कामोठे, पंजाबी कल्चर अँड वेल्फेअर असोसिएशन, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन या सर्व संस्था आणि त्यांचे सदस्य तसेच खारघर मधील नागरिकांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन हा सुरू केलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे असे अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सर्व संस्था आणि उपस्थित नागरिकांचे कौतुक करून आभार मानले.अशा प्रकारच्या विषयात इतर संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन असे स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपक्रम घ्यावेत. जेणेकरून आपले पनवेल महानगर पालिका क्षेत्र स्वच्छ आणि आरोग्यमय होईल असे त्यांनी सांगितले.
खारघरमध्ये स्वच्छता मोहिम
