। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) -2 अंतर्गत भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्लास्टिक संकलनासाठी क्लिन इंडिया ही मोहिम सुरु आहे. या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, रूरल यंग फाऊंडेशन, जिल्हा पाणी स्वच्छता कक्ष, रायगड जिल्हा परिषद यांच्यावतीने शनिवारी (दि.23) सकाळी 8 ते 10 या वेळेत अलिबाग समुद्रकिनार्यावर प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहिम संपन्न झाली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख रौतेला, रूरल यंग फाऊंडेशन सुशील साईकर, माणुसकी प्रतिष्ठान वायशेत, रोटरी क्लब अलिबाग, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते. यावेळी अलिबाग शिक्षक कलामंच यांच्यावतीने स्वच्छता विषयक पथनाटयाचे सादरीकरण व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.