अलिबाग समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महासंचालक एनसीसी यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुनित सागर अभियान अंतर्गत, 6 महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी युनिट एनसीसी मुंबई ग्रुप जे.एस.एम.कॉलेज, अलिबाग यांनी 5 आणि 7 डिसेंबर रोजी 5 तास श्रमदान करून 70 किलो प्लास्टिक आणि कचरा गोळा करून तो डस्टबिनमध्ये भरून नगरपालिकेला देण्यात आला.
भारताचा संपूर्ण सागरी पट्टा स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे पुनीत सागर अभियानचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत जे.एस.एम. कॉलेज अलिबागच्या एनसीसी युनिटच्या 40 कॅडेट्सनी सक्रिय सहभाग घेतला होता. या मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन डॉ. मोहसीन खान एनसीसी अधिकारी यांनी केले आणि कॅडेट्सना मार्गदर्शन करून समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली. या मोहिमेत ज्युनिअर अंडर ऑफिसर संस्कार मोकल व सीनियर अंडर ऑफिसर कुलदीप पाटील यांनी सक्रीय सहकार्य केले. या मोहिमेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी कॅडेट्सना प्रोत्साहन देऊन स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले.े

Exit mobile version