| अलिबाग | प्रतिनिधी |
शहीद दिवसाचे औचित्य साधून मेरा युवा भारत युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार रायगड अलिबाग सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमित पुंडे युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रमदानातून वरसोली समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम माझा भारत माझी जबाबदारी या थीम खाली राबविण्यात आली. यावेळी या स्वच्छता मोहिमेत जयवंत गायकवाड – रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, तपस्वी नंदकुमार गोंधळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, मेरा युवा भारत रायगडचे प्रतिनिधी जयेश म्हात्रे, वरसोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी प्रतिनिधी राज म्हात्रे, सुरज मोरे, प्रथमेश नाईक, श्रेयस बेलोस्कर, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी, स्थानिक नागरिक व युवक- युवती उपस्थित होते.






