आक्षी समुद्र किनार्‍यावर महास्वच्छता अभियान

। आक्षी । प्रतिनिधी ।

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त बुधवारी (दि.1) आक्षी समुद्र किनारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


आक्षी समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची वर्दळ वाढत चालली असून प्लॅस्टिकच्या कचर्‍यामध्ये वाढ होत आहे. आक्षी समुद्र किनार्‍यावर ग्रामपंचायतीकडून कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या असूनही प्लॅस्टिकचे ग्लास, पिशव्या, काचेच्या बाटल्या इतरत्र टाकल्या जातात. त्यामुळे आक्षी किनारा कचरामय झाला होता. आज नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून आक्षी समुद्र किनारी सकाळी 7 वाजता स्वच्छता मोहीमेस सुरवात झाली. किनार्‍यावरील सर्व कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा सुद्धा घेतली.


महिन्यातून किमान एकवेळ संपूर्ण आक्षी किनारपट्टी स्वछता अभियान राबवण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला. तसेच जे पर्यटन व्यावसायिक आहेत त्यांनीही पर्यटकांना समुद्र किनारी कचरा न टाकता कचरा कुंडीतच टाकण्यास प्रवृत्त करावे, असे आव्हान देखील ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version