कार्ला गडावर स्वच्छता मोहीम

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा परिसरातील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व आई एकविरा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी (दि. 3) आई एकविरा गड कार्ला लोणावळा येते स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.

यावेळी कार्ला गडाच्या पायथ्यापासून गडावरील परिसर स्वच्छ करण्यात आला. गडावर प्लास्टिक बॉटल, कचरा, कागदाचे गोळे, व इतर टाकाऊ वस्तू गोळा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच, कार्ला परिसरात प्लास्टिक बंदी जनजागृती म्हणून कापडी बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय ओगले, रवि भोपी, रोहित इंगळे, निलेश जाधव, अक्षय सकपाळ आदी उपस्थित होते.

Exit mobile version