माणगावात स्वच्छता अभियान

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील वार्ड क्र. 17 मधील संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संगमेश्वर मंदिर, हनुमान मंदिर व काळभैरव मंदिर परिसराची स्वच्छता शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी माणगाव नगरपंचायतीचे सफाई कामगार व द. ग. तटकरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी करून तिन्ही मंदिरांचा परिसर चकाचक केला. दिनेश रातवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पारखे व द. ग. तटकरे महाविद्यालयाचे प्रा. संदेश गावडे यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी व द. ग. तटकरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन ते अडीच तास श्रमदान करून संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संगमेश्वर मंदिर, हनुमान मंदिर व काळभैरव मंदिर परिसराची स्वच्छता केली.

Exit mobile version