महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पीएनपीमध्ये स्वच्छता अभियान

। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी संकुलात आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महात्मा गांधी जयंती आणि भारताचे दुसरे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोकुळेश्‍वर बसस्थानक, गोकुळेश्‍वर शिवमंदिर ते कनिष्ठ महाविद्यालय या भागात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात आली.
कोरोनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंगने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची फायदे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी राखावी, याबाबत प्राचार्य संजय मिर्जी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय मिर्जी यांच्यासह शिस्त कमिटी प्रमुख प्रा. तेजस म्हात्रे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख गणेश पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version