वावेघरमध्ये स्वच्छता अभियान

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी परिसरातील वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने महात्मा गांधी स्वच्छता पंधरवडा निमित्त रविवारी (दि.6) वावेघर बाजारपेठ व गावातील परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी हातात घमेल, फावडा, झाडू व स्वच्छतेची इतर उपकरणे घेऊन वावेघर गावातील रस्ते, गावातील मंदिरे, शाळा, बस थांबा व गावातील सार्वजनिक स्थळांची साफसफाई करुन ग्रामपंचायत घंटागाडीत संकलन करुन योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत सरपंच गीतांजली गाताडे, उपसरपंच जगन्नाथ चव्हाण, ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रेश्मा माळी, अमृता माळी, मनोज केदारी, चंदर माने, रवी राठोड, पारुबाई राठोड, शारु चव्हाण, ऋतिका माळी, भावेश माळी, दिपक बर्वे, गुरुनाथ माळी, निशा घरत, उर्मिला खारकर, नवसंजीवनी महिला ग्रामसंघ, सीआरपी प्रणय माळी, गुरुनाथ गाताडे, भुपेंद्र माळी, रेहाना हुसेन, डॉ. धिरज जैन, डॉ. पाठक, डॉ. भगत, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version