चेंढरेमध्ये शौचालय उभारणीतून स्वच्छतेचा उपक्रम

अ‍ॅड. परेश देशमुख यांचा पुढाकार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील परिसर स्वच्छ राहावा. तसेच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अ‍ॅड. परेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. संत रोहिदास नगर या ठिकाणी जांभा दगडाचे अद्ययावत असे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि.23) करण्यात आले. या शौचालयातून स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, चेंढरेच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, यतीन घरत, रोहन पाटील, ममता मानकर, अ‍ॅड. परेश देशमुख, विनोद दळवी, अजित माळी, प्रल्हाद म्हात्रे, मिथुन बेलोस्कर, संतोष पालकर, राजेंद्र बोराडे, शरद कापसे, आदित्य नाईक, भुमित गाला, अभिजीत सातमकर, जितेंद्र वाघ, महेश पवार, महेंद्र आंबेतकर, तुकाराम आंबेतकर, ग्रामसेवक निलेश गावंड, प्रताप राऊत, संजय जगे, विरेंद्र साळवी तसेच ठेकेदार विजय उर्फ बाबू स्वामी आदी मान्यवरांसह ग्रामंपचायतीचे पदाधिकारी, सदस्य, संत रोहिदास नगर येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

चेंढरे ग्रामपंचायत अलिबाग शहरानजीक आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतीमधील संत रोहिदास नगर या परिसरात स्वच्छता टिकून राहवी, नागरिकांचे आरोग्य राहावे यासाठी अ‍ॅड. परेश देशमुख, मिथून बेलोस्कर, संतोष पालकर या तिघांनी पुढाकार घेत एक अद्ययावत असे सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार याठिकाणी जांभ्या दगडांचे हे शौचालय बांधण्यात आले असून, येथील भिंतीवर वेगवेगळे स्वच्छतेचे संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या परिसरात एलईडी दिवे लावून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील विचार करण्यात आला आहे.

Exit mobile version