पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छता लीग

पनवेल महापालिकेकडून विविध उपक्रमांचे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।

केंद्र शासन 17 ते 2 ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ अमृतमहोत्सव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महापालिकेची पनवेल चॅम्पियन्स ही टीम सहभागी होणार असून स्वच्छ व सुंदर शहरासाठी शनिवारी (दि.17) सायकल रॅली आणि पदयात्रा काढण्यात येणार आहे.

शहराच्या स्वछतेमध्ये तरुणांचा सहभाग वाढवा, या अनुषंगाने पनवेल महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ अमृत महोत्सवातदेखील पालिका सहभागी झाली असून शनिवारी खारघरमध्ये सायकल रॅली तर कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात असून रॅली यशस्वी करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रभाग अधिकार्‍यांमार्फतही सायकल रॅली, पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. या रॅलीसाठी 50 हजार युवकांचे लक्ष महापालिकेने ठेवले आहे.

महापालिका क्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष नेतृत्व करणार आहेत.

रॅलीचे ठिकाण : मार्ग : वेळ (सकाळी 7.30)
खारघर- उत्सव चौक ते गुरुद्वार सायकल रॅली व स्वच्छता.
कळंबोली- पोलिस निवारा केंद्र ते लेबर नाका पदयात्रा.
पनवेल – महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पदयात्रा.

केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत पालिकादेखील सहभागी होणार आहे. शहराच्या स्वछतेमध्ये तरुणांचा सहभाग वाढवा व शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, यादृष्टीने शनिवारी खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

गणेश देशमुख,
आयुक्त पनवेल महापालिका
Exit mobile version