पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

| आगरदांडा | प्रतिनिधी |

350 वा शिवराज्याभिषेक प्रजासत्ताक दिनी 350 किल्ल्यांवर पुजन व ध्वजारोहण संकल्प असुन त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्लात (कासा) स्वच्छता पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या मावळ्यांनी केली. स्वच्छता करण्यासाठी मुरुडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. किल्ल्याच्या भिंतींवरील गवत व परिसर साफ करणे, या स्वच्छते मोहिमेवेळी किल्ल्यात असलेले गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करणे, भिंती, तोफांची स्वच्छता करून योग्य जागी बसविणे, किल्ल्यात कोटेश्वरी देवीचे मूळ स्थान आहे त्याची स्वच्छता करून पूजन करण्यात आले.

यावेळी आशिलकुमार ठाकुर, राहुल कासार, योगेश सुर्वे, सुनील शेळके, रूपेश जामकर, विजय वाणी, महेंद मोहिते, प्रदिप बागडे, प्रविण पाटील,दिपेश पेरवे, यश माळी, आशिष बुल्लू, प्रसाद उरणकर, संदेश आरकशी, अच्युत चव्हाण तसेच गडप्रेमी पद्मदुर्ग स्वयंसेवक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

Exit mobile version